breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : आज चेन्नईविरुद्ध कोलकाताला विजय अनिवार्य

दुबई – शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सला आज चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे. चेन्नईच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र कोलकाताला नमवून ते बाद फेरीसाठी पहिल्या सहा संघांमध्ये असणारी स्पर्धा तीव्र करू शकतात तसेच कोलकाता नाईट रायडर्ससाठी धोकादायक ठरू शकतात.

चेन्नई संघावर आता कोणतेही दडपण नाही, त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतात. त्यांनी अगोदरच्या सामन्यात विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला जोरदार पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे आज कोलकाताला सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

दरम्यान, धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नईला यंदा प्रथमच ‘आयपीएल’ची बाद फेरी गाठण्यात अपयश आले. ‘यंदाचा हंगाम आमच्यासाठी निराशाजनक होता परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही धोनीकडून कर्णधारपद हिसकावून घेऊ. पुढील हंगामासाठी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्यासाठी धोनीचा दृष्टिकोन आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असेल आणि तोसुद्धा कर्णधारपदावरून पायउतार होणार नाही, याची मला खात्री आहे’, असे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button