breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पेट्रोलची चोरी करणारी आंतरराज्य टोळी पकडली

वाई |

मुंबई-पुणे-सोलापूर जमिनीखालून जाणारी पेट्रोल वाहिनी सासवड (ता. फलटण) येथे फोडून इंधन चोरी आणि कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या सात जणांच्या टोळीस पकडण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनित हरिशंकर पाठक (वय ३२, मूळ गाव पिंडराई पटखान, जि. उत्तर प्रदेश सध्या वाल्हेकरवाडी, चिंचवड), यांच्यासह टोळीतील सदस्य बाळू आण्णा चौगुले (४२, रामनगर,चिंचवड, पुणे), मोतीराम शंकर पवार (२०, गवळीमाथा, भोसरी, पुणे), इस्माईल पिरमहंमद शेख (६२, डी मार्ट शेजारी, पिंपरी, पुणे), श्याम शिवाजी कानडी (५०, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्याचबरोबर जमीन मालक दत्तात्रय सोपान लोखंडे (४१, सासवड, ता. फलटण) व नामदेव ज्ञानदेव जाधव (२८, दालवडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची ही वाहिनी फोडून सुमारे दोन लाख रुपयांची पेट्रोल चोरी झाली असल्याबाबत लोणंद (ता. खंडाळा) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्ह््याच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर यांनी आज सात जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या नामदेव जाधव याने शेतीमालक दत्तात्रय लोखंडे यांच्याशी या पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीची ओळख करून दिली होती. त्यानुसार पुण्यातील या टोळीने पेट्रोलची चोरी केली होती. या वेळी वाहिनी फोडताना जादा पेट्रोल बाहेर पडून त्याने शिवारातील विहिरी भरल्या. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. या गुन्ह््यात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

वाचा- घरी परतणाऱ्या मजूर महिलेची रस्त्यात प्रसूती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button