breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अलिबाग येथे २२ खोल्यांच्या करोडो रुपयांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

महा ई न्यूज| मुंबई :  पंजाब आणि महाराष्ट्र  बॅंक (पीएमसी) प्रकणात आज ईडीने अलिबाग येथे छापा टाकला. करोडो रुपयांच्या या अलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच बंगल्याच्या आवारात कार आणि अन्य गाड्या आढळून आल्या आहेत. यापैकी एक कार कर्नाटकमधील असून दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत. तसेच ईडीच्या छाप्यात मालदीवमध्ये एक याट आणि एअरक्राफ्टही आढळून आले आहे.

बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर आहेत. तर कर्नाटक पासिंगची कार ही हाऊसिंग डेव्हलपव्हरच्या नावावर दिसत आहे. पीएमसी प्रकरणात ईडीने तपास सुरु केला आहे. ईडीने आतापर्यंत दोन ठिकाणे शोधली आहेत. वाधनवच्या जवळचे सहकारी कोण होते, याचा शोध घेण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button