breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण 31 जुलैपर्यंत बंद, डीजीसीएकडून जाहिर

नवी दिल्ली – कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर घातलेली बंदी ३१ जुलैपर्यंत सरकारने वाढवली आहे, अशी माहिती डीजीसीएने काढलेल्या पत्रकात दिली आहे. मात्र या काळात काही ठराविक मार्गांवरील आणि वंदे भारत मिशनमधील विमान उड्डाणे सुरू राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.

एअर बबल अंतर्गत काही देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. याबाबत भारताने अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान आणि फ्रान्ससह २४ देशांसोबत करार केला आहे. त्यानुसार या देशांमधील काही शहरांदरम्यान थेट आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहे. मात्र सर्वसामान्य आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर असलेली बंदी ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button