पिंपरी / चिंचवड

पोलीस दलाला शिवीगाळ करत पोलिसांना धक्काबुक्की

पिंपरी | प्रतिनिधी

हॉस्पिटलमध्ये गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका व्यक्तीने पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 8) मध्यरात्री दीड वाजता मंकीकर हॉस्पिटल, गव्हाणे वस्ती, भोसरी येथे घडली.

सोन्या चासकर असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाणे वस्ती भोसरी येथे असलेल्या मंकीकर हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि पेशंट यांना शिवीगाळ करत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार कर्तव्यावर असलेल्या फिर्यादी पोलीस शिपाई विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी सोन्या चासकर हा पोलीस खात्याच्या नावाने मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. फिर्यादी यांच्यासह सर्व पोलिसांना शिवीगाळ करत फिर्यादी यांना ‘तुमची नोकरी घालवतो’ अशी धमकी दिली. पोलिसांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की करत फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button