breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला ; नगरसेवक बोराटेचा राजीनामा स्वखुशीने – एकनाथ पवार

पिंपरी-   नगरसेवक वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यपदाचा दिलेला राजीनामा हा नाराजीतून दिलेला नाही. तर, नगरसेविका अश्विनी बोबडे यांना विधी समितीवर संधी देण्यासाठी स्वखुशीने दिला असून त्यांचा अर्थ तुम्ही चुकीच्या पध्दतीने लावला, असे स्पष्टीकरण सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले.

सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये सातत्याने राजीनामा सत्र सुरू आहे. त्यात वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांनी नाराजीतून हा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पक्षनेते एकनाथ पवार यांनी त्यांचा राजीनामा नाराजीमुळे नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, अश्विनी बोबडे यांची विधी समितीवर निवड होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी क्रीडा समिती सदस्यपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता.

त्यानंतर पक्षाच्या सूचनेनुसार वसंत बोराटे यांनी स्वखुशीने विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी आश्विनी बोबडे यांची नियुक्ती विधी समितीवर केली जाणार आहे. पक्षार्तंगत तडजोडीतून हा राजीनामा दिला गेला, परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button