पिंपरी / चिंचवड

विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

पिंपरी | प्रतिनिधी

पतीमध्ये असलेले दोष लपवत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 29 नोव्हेंबर 2018 ते 8 फेब्रुवारी 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला.

पती सलीम मस्तान शेख (वय 38), सासरे मस्तान मुल्ला शेख (वय 60), सासू (वय 55), नणंद (वय 28, सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय पीडित विवाहितेने माहेरी आल्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मिळून फिर्यादी यांच्या पतीमध्ये असलेले दोष लपवून फिर्यादिस मानसिक व शारीरिक त्रास दिला. याबाबत बाहेर न सांगण्याची आरोपींनी धमकी दिली. तसेच पती आणि सासरच्या लोकांनी फिर्यादिस माहेरी राहण्यास भाग पाडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button