breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आषाढी वारीसाठी भारतीय रेल्वे सज्ज; वारकऱ्यांसाठी धावणार ‘या’ विशेष गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेच्या वतीने आषाढीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी एकूण ८२ विशेष गाड्या धावणार आहेत. नियमित धावणाऱ्या गाड्यांसह एकूण १८१ गाड्या या कालावधीत धावतील. यामध्ये नागपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २५ आणि २८ जूनला चार फेऱ्या होतील.

नागपूर- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी आणि अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडीच्या २६ आणि २९ जूनला चार फेऱ्या होतील, खामगाव- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी आणि भुसावळ- पंढरपूर विशेष रेल्वे गाडीच्या २६ आणि २९ जूनला चार फेऱ्या होतील. लातूर- पंढरपूर- लातूर विशेष रेल्वे गाडीच्या २६ ते ३० जूनपर्यंत आठ फेऱ्या होतील, मिरज- पंढरपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २४ जून ते ३ जुलै दरम्यान आणि मिरज – कुर्डुवाडी – मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २० फेऱ्या होतील. पंढरपूर -मिरज -पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीच्या २४ जून ते ३ जुलै दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत.

हेही वाचा – ‘दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का लावणार’; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा

जालना – पंढरपूर, पंढरपूर – नांदेड, औरंगाबाद – पंढरपूर, पंढरपूर – औरंगाबाद या विशेष रेल्वेच्या २८ व २९ जून अशा दोन फेऱ्या होणार आहेत. आदिलाबाद- पंढरपूर- आदिलाबाद विशेष रेल्वे गाडीच्या २८ जून आणि २९ जून अशा दोन फेऱ्या होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button