breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
पिंपरी – महापालिकेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे व ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे, प्रफुल्ल पुराणिक, संतोष जाधव, भरत गायकवाड, रवि राठोड, सिताराम राठोड, विष्णू गवारी, रामदास कटके, संजय जरे आदी उपस्थित होते.