breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज! काय आहे खासियत

Indian Air Force : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हवाई दलाकडून आज ९१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने परेडचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी परेडची सलामी स्वीकारली. तसेच त्यांच्या हस्ते परेडमध्ये हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यासाठी हवाई दलाचा जुना ध्वज उतरवून सन्मानपूर्वक हवाई दल प्रमुखांना सुपूर्द करण्यात आला.

भारतीय हवाई दलाने एका निवेदनात माहिती दिली की, भारतीय हवाई दलाची मुल्य योग्य पद्धतीने दर्शवण्यासाठी नवीन ध्वज बनवण्यात आला आहे. तसेच ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला हवाई दल क्रेस्ट देण्यात आले आहे. आता हा ध्वज वायुसेना संग्रहालयात प्रदर्शित केला जाणार आहे.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं मत होतं’; शिंदे गटातील नेत्याचं विधान 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय हवाई दलाची अधिकृतरित्या ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९४५ साली हवाई दलाच्या दर्जेदार कामगिरीमुळे हवाई दलाच्या नावात रॉयल शब्द जोडून सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दल हे ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये हवाई दलाने आपल्या नावातील ‘रॉयल’ हा शब्द काढून टाकला. तसेच हवाई दलाचा झेंडा देखील बदलण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button