breaking-newsक्रिडा

चेन्नईला विजेतेपदाचे वेध

चेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवताना दोन वर्षाच्या बंदीनंतर यशस्वी पुनरागमन केले आहे. इतकेच नव्हे तर चेन्नईने 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले आहे. या हंगामात चेन्नईच्या सर्वच खेळाडूंनी पहिल्याच सामन्यापासून समतोल कामगिरीचे प्रदर्शन करताना संघाच्या विजयाला मोलाचा हातभार लावला आहे. या खेळाडूंमध्ये चेन्नईचे सलामीवीर अंबाती रायुडू आणि शेन वॉटसन यांचा मोलाचा सहभाग आहे. दोघांनीही हंगामात एक-एक शतक झळकावले असून त्यांच्या व्यतिरिक्‍त चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, ड्‌वेन ब्राव्हो यांनी देखील उत्कृष्ट फलंदाजी केली असून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. ब्राव्होच्या अष्टपैलू गुणवत्तेचा चेन्नईला मोठा फायदा झाला आहे. तसेच धोनीचे नेतृत्वही झळाळून उठले आहे. धोनीची वैयक्‍तिक कामगिरीही जगभरातील समीक्षकांच्या प्रशंसेचा विषय ठरली आहे. त्यामुळे चेन्नई संघाला आता विजेतेपदाचे वेध लागेल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button