breaking-newsताज्या घडामोडी

#IndiaFightsCorona: हॉस्पिटल-मेडिकल वगळता सांगोला शहर पूर्णपणे बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगोला । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता परवा पासून म्हणजेच शनिवार दि.25 एप्रिल २०२०, रविवार दि.26 एप्रिल २०२० व  सोमवार  दि.27 एप्रिल २०२० या तीन दिवसात हॉस्पिटल व मेडिकल वगळून संपूर्ण शहर बंद राहील, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगोला शहरातील सर्व नागरीकांनी कळविण्यात येते की या तीन दिवसात अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील. 

मडिकल व हॉस्पिटल सोडुन इतर सर्व दुकाने, फळे व भाजीपाला विक्री देखील या दिवशी बंद राहतील.

तरी सांगोला शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button