breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ट्विटकरकडून पुन्हा एकदा घोडचूक, भारताच्या नकाशात छेडछाड

नवी दिल्ली – ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सतत तणाव निर्माण होत असून आता पुन्हा एकदा ट्विटरने उद्दामपणा केला आहे. भारताच्या नकाशावर छेडाछाड केली असून ट्विटरच्या वेबसाईटवर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र देश दाखवले आहे. यामुळे ट्विटर पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताच्या सीमेबाहेर दाखवण्यात आले आहे. ट्विटरच्या करिअर पेजवर हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. ट्विटरच्या नकाशावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. मात्र ट्विटरकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारत सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सरकार यासंदर्भात बरीच तथ्ये संकलित करीत आहे, जसे की नकाशामध्ये हा बदल कधी झाला, वेबसाइटवर हा नकाशा कधी ठेवला गेला आणि नकाशामधील बदलामागील हेतू काय आहे. ट्विटरवर हा नकाशा देणारे लोक कोण आहेत, कोणी हा नकाशा लावला आहे? अशा अनेक गोष्टींबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारतर्फे ट्विटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ट्विटरच्या करिअर पेजवरील ट्वीप लाइफ विभागात जगाचा नकाशा आहे. येथून कंपनी ट्विटर टीम जगात कोठे आहे हे दाखवते. या नकाशामध्ये भारत देखील आहे परंतु भारताचा नकाशा विवादित म्हणून दर्शविला गेला आहे. याआधीही लडाखचा भाग भारताचा भाग म्हणून दाखविला गेला नव्हता. मात्र, नंतर ती चूक दुरुस्त करण्यात आली. सध्या भारत सरकार उघडपणे ट्विटरला विरोध करत आहे आणि केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरची भारताबद्दल दुटप्पी वृत्ती आहे असे म्हटले होते. त्यामुळे आता ही बाब अधिक गंभीर होऊ शकते. ट्विटरचा हेतू योग्य वाटत नाही असेही रवीशंकर प्रसाद यांनी आधी म्हटले होते.

याआधी देखील १२ नोव्हेंबर रोजी ट्विटरने एका नकाशाद्वारे भारतातील लडाखचा भूभाग हा चीनच्या हद्दीत दाखवला होता. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या नकाशावर भारताने आक्षेप घेतला होता. याची दखल घेत ट्विटरने आपल्या या चुकीबद्दल माफी मागितली होती. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही चूक सुधारणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button