breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडाराजकारण

स्वतंत्र विद्यापीठाचा वाद : रिपब्लिकन सेनेकडून संजय निंबाळकरांवर शाईफेक

औरंगाबाद : उस्मानाबादच्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून आज रिपब्लिकन सेना आणि उस्मानाबादच्या उपकेंद्राचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यात झटापट झाली. यादरम्यान, निंबाळकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून आज वाद झाला. मागणी करणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी हा विद्यापीठ विभाजनाचा घाट असल्याचा आरोप करीत व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर शाईफेक केली.

आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर निंबाळकर हे इतर सदस्यासोबत बाहेर येत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. व त्यांच्यावर शाईफेक केली. या वेळी निकम आणि निंबाळकर यांच्या मध्ये झटापट देखील झाले. या वेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर शहिदांच्या बलिदानाचा हा एक प्रकारे अवमान करूम राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे संजय निंबाळकरसारख्या प्रवृत्तींना धडा शिकवून विभाजन हणून पाडू, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button