breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: धक्कादायक! राष्ट्रपती भवनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, अनेक कर्मचारी क्वारंटाइन

राष्ट्रपती भवनात तैनात असणाऱ्या सहायक पोलिस आयुक्तांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांना दिल्लीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर राष्ट्रपती भवनात तैनात असणाऱ्या अनेक पोलीस तसंच कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचं ऑफिस राष्ट्रपती भवन इमारतीत आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रपती भवन कॉम्प्लेक्समधील जवळपास ११५ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रपती सचिवालयामधील एकही कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही.

१३ एप्रिल रोजी करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती राष्ट्रपती सचिवालयाची कर्मचारी किंवा राष्ट्रपती भवन परिसरात वास्तव्यास नव्हती. पण जेव्हा संबंधित व्यक्तीचा एक नातेवाईक राष्ट्रपती भवनात वास्तव्यास असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सात जणांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून इतरांचा निगेटिव्ह आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button