ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारत फ्लॅग फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा’ उपक्रम

पिंपरी चिंचवड | भारत फ्लॅग फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा’ वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्टदरम्यान हा उपक्रम चालणार असून प्रतिज्ञा वाचन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.तिरंगी ध्वजाला वंदन करून ही प्रतिज्ञा वाचन करावे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक गिरीश मुरुडकर, कार्यकारी अध्यक्ष राहूल भालेराव यांनी केले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा तयार करण्यात आली असून प्रतिज्ञा वाचन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या सुराज्य प्रतिज्ञेचे लेखन गिरीश मुरुडकर यांनी केले आहे.

शाळा सुरू झाल्यावर ही सुराज्य प्रतिज्ञा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी भारत फ्लॅग फाउंडेशनचे प्रतिनिधी विनामूल्य तासिका घेऊ शकतील. शाळा, कॉलेज, संस्थांनी 9822013292, 9850001753 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे. भारत फ्लॅग फाउंडेशनचे हे 21 वे वर्षे आहे. झेंडे पायदळी न जाऊ देण्याचा उपक्रम यंदाही सुरू आहे. ध्वज माहितीची आणि झेंडे कलेक्शन बॉक्सचे मोफत वितरण मुरूडकर झेंडेवाले, इलेक्ट्रिक मार्केट, मोती चौक इथे सुरू आहे, असे मुरुडकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button