breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

विदर्भात मुसळधार, चौघे वाहून गेले

  • अनेक नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत

नागपूर |

उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मोसमी पाऊस सक्रि य झाला असून पावसाने रौद्ररूप धारण के ले आहे. नद्यांना आलेल्या पुरात वध्रेत दोघे, चंद्रपूर जिल्ह्यत राजुरा तालुक्यात एक शेतकरी तर यवतमाळ जिल्ह्यत एक असे चौघे जण वाहून गेले. मात्र यवतमाळ जिल्ह्यतील तरुणाला वाचवण्यात यश आले. वर्धा जिल्ह्यतील समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात रंभाबाई नामदेव मेश्राम (७०) ही महिला वाहून गेली तर तास येथील संतोष शंभरकर हे बैल बंडीसह वाहून गेले. पुरामुळे २० गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा गावाला बसला. या गावात एक शेतकरी वाहून गेला. तर राजूरा-गडचांदूर व राजुरा-गोवरी हे मार्ग बंद झाले. राजुऱ्यात पुरसदृश स्थिती निर्माण झाली असून शहरात देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. चंद्रपूर शहरातही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अमरावती जिल्ह्य़ात काही ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अंजनगाव-सुर्जी तालुक्यातील दहेगावला पूर आला. तर मेळघाटातील सेमाडोह पुलाचा काही भाग खचल्याने धारणी-परतवाडा मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू होती. सिपना नदीही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असून चिखलदऱ्यातही मुसळधार पाऊस आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ातील पैनगंगा अभयारण्यालगतच्या गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, काही कालावधीनंतर तो पूर्ववत झाला. एक तरुण पुरात वाहून गेला, पण आश्चर्यकारकरित्या तो वाचला. अतिवृष्टीमुळे सुमारे ४० घरांची पडझड झाली. बेंबाळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. अकोला जिल्ह्य़ातही मध्यरात्रीपासून अतिवृष्टी होत असून मोर्णा, काटेपूर्णा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून शहरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बुलढाणा, वाशीम या जिल्ह्य़ात संततधार आहे. वर्धा जिल्ह्य़ातही अतिवृष्टीमुळे तीन धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्य़ातही कळमेश्वर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला. याठिकाणी चंद्रभागा नदीला पूर आल्याने धापेवाडय़ातील विठ्ठल मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी आले. कळमेश्वर तालुक्यात खडकनाल्याला पूर आल्याने वाहतूक खोळंबली. अतिवृष्टीमुळे संपूर्ण विदर्भात दाणादाण उडाली आहे.

  • भिवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

नागपूर जिल्ह्य़ातील भिवापूर तालुक्यात गुरुवारी दुपापर्यंत ८५ तर कु ही तालुक्यात ७२ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यात ९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल तालुक्यात ६८, चिमूर तालुक्यात ७७ व सिंदेवाही तालुक्यात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर वर्धा जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यात ७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button