TOP Newsताज्या घडामोडीपुणे

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

पुणे : हिमालयाच्या पश्चिम भागात १ डिसेंबरच्या आसपास पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. परिणामी गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागात असलेले ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा हळूहळू थंडी वाढू लागली आहे.

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच मराठवाडा भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या वरील भागात ही स्थिती तयार झाली होती. मात्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी घट कायम होती. त्यामुळे या भागात थंडीचा कडाका कायम होता. आता मात्र, दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात मंगळवारपासून थंडी वाढू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button