breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामनाच्या संपादकांनी स्वतःच्या कर्तृत्वाची उंची मोजावी : जयंत पाटील यांचा टोला

मुंबई – अजित पवार यांच्यावर टीका करण्या आधी सामनाच्या संपादकांनी स्वतःच्या कर्तृत्वाची उंची मोजायला हवी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावरील टिकेचा समाचार घेतला.
शनिवारचा दिवस सामनातील अग्रलेखात अजित पवार यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात करण्यात आलेल्या टिकेमुळे गाजला. त्या टिकेला अजित पवार यांनी कोल्हापूर येथे उत्तर दिले. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सामनाची होळी केली.
या टिकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यावर सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून अत्यंत असभ्य भाषेत टिका करण्यात आली असून, अजित पवार यांच्यासारख्या मेहनती नेत्याबद्दल हि भाषा वापरणे अत्यंत निषेधार्ह आहे.
ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्यावर या भाषेत टिका करण्याआधी सामनाच्या संपादकांनी स्वतःच्या कर्तृत्वाची उंची मोजायला हवी होती. ‘सामना’ने राजकीय सभ्यतेची मर्यादा ओलांडली म्हणून ती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ओलांडणार नाहीत. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पवारसाहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाच्या मार्गाने वाटचाल करत राहतील आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्या सामनाकार व्यक्तींना महाराष्ट्रातील जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button