breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्रात सरकार कोणाचेही असले तरीही सैन्याच्या मनोधैर्यात फरक पडत नाही – संजय राऊत

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सुरू झाल्याबरोबर शिवसेनेने चीन मुद्दयावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा असा चिमटाही संजय राऊत यांना राज ठाकरेंना काढला आहे.

चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्य़ाचा प्रयत्न केला का, याबाबतचं निवेदन केंद्रानं सभागृहात करावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनाबाबत माहिती देत यंदाच्या वर्षी भरगच्च सभागृह नसेल पण कामकाज होईलच अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी चीन मुद्द्यावरुन त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले.

विस्कटलेल्या आर्थिक घडीबाबत शिवसेना जाब विचारणार, असं म्हणत केंद्रातील सत्ताधाऱ्यांबाबत वक्तव्य केलं. ‘केंद्रात कोणतं सरकार आहे याच्याशी सैन्याच्या मनोधैर्याचा संबंध नाही. सरकार कोणाचंही असलं तरी सैन्य लढतंच. सैन्याच्या पाठीशी सारा देश उभा राहीला आहे’, असं राऊत म्हणाले. चीनला धडा शिकवण्यासाठी म्हणून चीनी मोबईल ऍप आणि ‘पबजी’ बॅन करण्याच्या केंद्रयाच्या निर्णयावर टीका करत, पबजी बॅन करुन चीन मागे हटत नाही; असा टोला राऊतांनी लगावला.

राऊतांनी यावेळी राज ठाकरे यांनाही नाव न घेता सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं. ‘नवी पिढी मराठीपण विसरली आहे. इतर नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा. आमच्या आवाहनाला टाईमपास समजू नये, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कमी लेखावं हे चालणार नाही.

दिल्लीतील नेत्यांनीही भूमिका’ घ्यावी असं ते म्हणाले. महाराष्ट्राचा अपमान होत असताना गप्प बसत असले तर ते मराठी आहेत का ? असा खडा सवाल करत, शिवसेना ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची गंगोत्री आहे असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button