breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत चित्रपट निर्मितीशी संबंधित मंडळी संपावर जाणार

लॉस एंजिल्स – हॉलिवूड कामगारांच्या मागण्यांसाठी शनिवारी आणि रविवारच्या संपाला पाठिंबा देण्याच्या बाजूने ५० हजारांपेक्षा अधिक टीव्ही आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित कामगार आणि कलाकारांच्या संघटनांच्या सदस्यांनी मतदान केले आहे. यात आतापर्यंत ९० टक्के कर्मचारी आणि कलाकारांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच हा मोठा ऐतिहासिक संप होणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचा तो सर्वात मोठा संप असेल, असे आयएटीएसई या संघटनेने म्हटले आहे.

हॉलिवूडने घातलेल्या अटी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय अडचणीच्या ठरत आहेत. त्यांना पुरेशी झोप आणि विश्रांती मिळत नाही. किमान सुविधा मिळत नाहीत. पगारही कमी मिळतो. कोरोनाचा या क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या आणि इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि इंटरनॅशनल अलाइंस ऑफ थिएटरल स्टेज एम्प्लॉईज (आयएटीएसई) या संघटनेशी संबंधित कॅमेरा ऑपरेटर, हेअर स्टाईलीश, मेकअप आर्टिस्ट, पटकथाकार आणि संघटनेच्या इतर सदस्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. यामुळे विकेंडला हॉलीवूडमधील ऐतिहासिक संप होणार आहे. आयएटीएसई आणि एमपीटीपी यांच्यात ३ वर्षांचा करार झाला होता. तो संपल्यानंतर नवीन करार आणि वाटाघाटी झालेल्या नाहीत. त्यामुळे हा संप केला जाणार आहे. त्यासाठी १ ते ३ ऑक्‍टोबर दरम्यान सदस्यांचे मतदान घेण्यात आले. यात संस्थेच्या ६० हजार सदस्यांपैकी ९० टक्के सदस्यांना मतपत्रिका मिळाल्या व त्यांनी मतदान केले. त्यात ९८ टक्के सदस्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. यात कॅलिफोर्निया, जॉर्जिया आणि न्यू मेक्सिकोचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button