breaking-newsताज्या घडामोडीपुणे
प्लास्टिक पिशव्याचा साठा करणा-यावर दुकानावर दंडात्मक कारवाई
पिंपरी – प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणा-या चिंचवड परिसरातील तीन स्वीट मार्टवर कारवाई करत महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
चिंचवड, लिंकरोड येथील धनलक्ष्मी स्वीट, कृष्णा स्वीट व वैभव स्वीट या दुकानांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून 10 किलो वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. ‘ब’ श्रेत्रीय अधिकारी संदीप खोत, सहायक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, के. बी. पारोल, आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, साठा, विक्री व वापर बंदी अंतर्गत यापुढेही कारवाई सुरुच ठेवण्याचा इशारा श्रेत्रीय अधिकारी संदीप खोत यांनी दिला आहे.