breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

साखरेऐवजी या पदार्थांचे सेवन करा; आरोग्य राहिल निरोगी

Sugar Substitutes | दररोजच्या जीवनात आपण साखर अधिक प्रमाणात खातो. साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेहासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. रक्तातील साखर वाढली किंवा कमी झाली की, उच्च रक्तदाव सारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला सतत गोड पदार्थ खाण्यास आवडत असतील आणि आरोग्याचीही अधिक काळजी असेल तर पुढील पदार्थांचे सेवन करा..

गूळ : आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करा. यामध्ये अनेक अँटिऑक्सि़डेंट असतात. जे तुमच्या आरोग्यासोबतच चवीलाही चांगले लागते. आहारात याचा वापर करुन आरोग्याची काळजी घेऊ शकता.

हेही वाचा     –    ‘हुंडा न मिळाल्यानं वंचितनं लग्न तोडलं’; विजय वडेट्टीवारांचं प्रकाश आंबेडकरांना खोचक प्रत्युत्तर 

खजूर : साखरेच्या तुलनेत खजुरमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे साखरेचे सेवन करुन मिळवू शकत नाही. खजूर अनेक प्रकारे पौष्टिक असतात. यामध्ये नैसर्गिक साखर असते. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

नारळ : चहा-कॉफीसह अनेक गोष्टींमध्ये साखर अधिक प्रमाणात आढळते. आरोग्याच्या दृष्टीने हा कृत्रिम साखरेचाही पर्याय चांगला आहे. नारळात अनेक पोषक तत्वे असतात. फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ते तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button