breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सुप्रिया सुळेंना मत देणं म्हणजे..’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

पुणे | लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचं चित्र आहे. बारामतीवर विशेष संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच नणंद-भावजय असा सामना आहे. आता बारामतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी मोठं विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा शरद पवारांना सवाल आहे, शरद पवार बारामतीत उमेदवार नाहीत. सुनेत्रा पवार निवडून आल्या तर मोदींसाठी हात उंचावतील आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात उंचावतील. म्हणजेच काय सुनेत्रा पवार यांना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत आहे. सुप्रिया सुळेंना दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. हे काही लोकांना समजत नसेल तर आम्ही काय करणार? असा सवाल केला.

हेही वाचा    –    पिंपरी-चिंचवडमध्ये करदात्यांना २४ कोटींची भरघोस अशी मिळाली कर सवलत 

महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. जागा निश्चित झाल्या आहेत सगळ्या उर्वरित जागा आम्ही आता एकत्रित रित्या जाहीर करु. महाराष्ट्रात आमच्या थोड्या जागा राहिल्या आहेत. त्यावर एकमतही झालं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोदींवर विश्वास ठेवून कुणीही प्रवेश केला तरीही आमचा विरोध नाही. अधिकृतरित्या आम्हाला कळवलं गेलं की आम्ही एकनाथ खडसेंचंही स्वागतच करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्याबरोबर यावं अशी आमची इच्छा आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा दिला होता. मधल्या काळात ते आमच्यापासून दूर गेले होते. मात्र आता ते हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहेत. तो विचार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ते हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहेत. तो विचार आमच्यासाठी महत्वाचा आहे. ते जर बरोबर आले तर आम्ही स्वागतच करू पण पक्ष त्यांचा आहे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button