breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत

नाशिक – नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. आता नाशिकमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानं रूग्णांना रूग्णालयात बेड मिळत नसल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे.

रविवारी नाशिकमध्ये 2 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक महापालिका श्रेत्रात 1 हजार 890, नाशिक ग्रामीणमध्ये 917, मालेगाव महापालिका हद्दीत 78 तर जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या 40 रुग्णाचा समावेश आहे.

वाचा :-अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button