breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

बुलढाणा – राज्यात कोरोना काळात अनेक विवाह सोहळे पार पडले. तर याच काळात अनेक बालविवाह झाल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या तत्परतेने अनेक बालविवाह रोखण्यात यश आले होते. आता असाच एक अघोरी प्रकार बुलढाण्यामध्ये घडणार होता. परंतू महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तात्काळ घेतलेल्या अॅक्शनमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखता आला आहे.

महिला आणि बालविकास मंत्र्यालयाच्या हेल्पलाईन नंबर 1098वर एक फोन आला. या फोनवरून एका व्यक्तीने एका बालिकेचा गुजरातमध्ये नेऊन बालविवाह करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर महिला आणि बालविकास मंत्र्यालय अॅक्शन मोडमध्ये आले. यशोमती ठाकूर यांना ही माहिती कळताच त्यांनी थेट आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

वाचा :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था आणि बुलढाणा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर त्यांनी गुजरातच्या गुजरात चाईल्ड लाईन आणि जोलवा येथील बालविवाह प्रतिबंधक आधिकारी यांना माहिती देण्यात आली. जोलवाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोहचून हा बालविवाह रोखला.

दरम्यान, गुजरातच्या जोलवा पोलीस चौकीत या प्रकरणात ‘बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006’ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तर संबंधीत बालिकेच्या पुनर्वसनासाठी पुढील प्रकिया केली जात आहे. बालविकास मंत्र्यालयाच्या या तात्काळ कारवाईमुळे यशोमती ठाकूर यांच कौैतूक केलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button