Uncategorized

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या २८ संशयितांपैकी १० मुंबईत

मुंबई – महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे संशयित रुग्णाची संख्या २९ झाली असून एकट्या मुंबईत ओमिक्रॉनचे १० संशयित रुग्ण आहेत तर इतर 18 जण हे मुंबई, पुणे, ठाणे या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. ओमिक्रॉनचे हे २९ संशयित रुग्ण आंतरराष्ट्रीय विमानाने १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबईत आलेल्या ९ परदेशी नागरिकांसह १० जणांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कर्नाटकातील दोन कोरोना ओमिक्रॉन रुग्णांपैकी एक ६६ वर्षांचा रुग्ण दक्षिण आफ्रिकेत पळाला आहे. दुसरा ओमिक्रॉन रुग्णांच्या संपर्कातील पाचजण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

महाराष्ट्रातील या २८ जणांचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे या गजबजाटीच्या शहरांमध्ये संशयित कोरोना ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. संशयित ओमिक्रॉन रुग्णांची संख्या मीरा भाईंदर १, मुंबई १0, कल्याण१, पुणे १, पिंपरी २, सातारा १० अशी आहे. हे सर्व संशयित रुग्ण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले २५ जण हे परदेशी प्रवास करुन आले आहेत, तर तिघे जण हे त्यांच्या संपर्कातील आहेत. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची ओमिक्रॉनची जिनोम चाचणीही करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

रशियाहून कुटुंबासह परतलेल्या अंबरनाथमधील सात वर्षाच्या एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ७ वर्षाची बालिका आई वडिलांसह रशियाला फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परतलं. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता ती कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले. मुलीचे वडील निगेटिव्ह असून तिच्या आईच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आल्याचं उघड झालं आहे. कोरोना पॉझिटिव्ह मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी आज लॅबला पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन झाले असून त्यांची इमारत सील करणार असल्याची माहिती पालिकेनी दिली आहे.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, 30 देशांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय. पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत. मात्र दक्षता पाळावी. कोरोनाच्या सर्व नियमांचे जनतेने पालन करावे असे टोपे म्हणाले.

दरम्यान, दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेला पळालेला ओमिक्रॉनचा रुग्ण हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा रहिवाशी आहे. २० नोव्हेंबरला तो कर्नाटकात आला होता. त्यावेळी तो कोरोना निगेटिव्ह होता. पण हॉटेलमधील चाचणीत तो पॉझिटिव्ह निघाला होता. त्याला विलगिकरणात ठेवले होते. त्याच्या संपर्कातील २२ लोकांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांनतर त्याने 23 नोव्हेंबरला एका प्रायव्हेट लॅबशी संपर्क साधत त्याने निगेटिव्ह रिपोर्ट मिळवला. निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून त्याने हॉटेल सोडलं आणि मग टॅक्सीने तो एअरपोर्टवर गेला. या ठिकाणहून पहाटेच्या विमानाने दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला पळून गेला. तो पळून गेल्यामुळे स्थानिक यंत्रणेला धक्का बसला आहे .

कर्नाटकमधील दुसऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली असून तो डॉक्टर आहे. तो कुठेही फिरायला गेला नव्हता. २२ नोव्हेंबरला नमुन्यांची चाचणी केली असता त्याला लागण झाली असल्याची स्पष्ट झाले. २१ नोव्हेंबरला त्याला ताप आणि अंगदुखीसारखी लक्षणे जाणवत होती. यानंतर त्याने २२ नोव्हेंबरला रुग्णालयात जाऊन आरटीपीसीआर चाचणी करुन घेतली. दुपारी चार वाजता रिपोर्ट आले असता ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. त्याच्या संपर्कातील पाच जणांनाही कोरोना झाला आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. कर्नाटकात आढळून आलेल्या कोरोना संक्रमित दोन्ही रुग्णांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button