breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

देवदर्शनाला जावू नका, बोलणारा देव मीच – भाजप उमेदवारांचा अजब दावा

सोलापूर – भाजपचे सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी अजब दावा केला आहे. देवदर्शनाला बाहेर कोठेही जाऊ नका कारण बोलणारा देव मीच आहे असं शिवाचार्य म्हणाले. त्यांची ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. 14 ते 18 एप्रिलपर्यंत सुट्टीचे दिवस आहेत. त्यामुळे बाहेर कुठेही जाऊ नका. देवाला गेला तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देवदर्शनलाही जाऊ नका, तेथे गेलात तो तिथे भेटणार नाही. देव भेटलाच तर म्हणेल की आलास तसं परत जा. कारण बोलणारा देव मीच आहे. असा अजब दावा डाॅ. शिवाचार्य यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुक काळात यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button