शरद पवार झाले, काश्मीर मधून पंडित जेव्हा बाहेर पडले तेव्हा सत्तेत व्ही पी सिंग यांचे सरकार होतं. त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. म्हणजेच भाजप सत्तेत असताना काश्मीर मधून पंडित बाहेर गेले असा दावाही पवार यांनी केलाय. पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे मात्र टीका करताना विद्वेष नसायला हवा. काश्मीर फाईल या चित्रपटामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं. समाजात विद्वेष पसरवायला मदत केली जाते. पंतप्रधान मोदींकडून ही त्यावर भाष्य केले जाते असं म्हणत शरद पवार यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली.