breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीतीत कोरोना वारसांना मदतीचे अर्ज भरण्यास सुरुवात

  • स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले प्रभागात अर्जांचे वाटप
  • कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधी मिळणार असून, त्याअंतर्गत कुदळवाडी येथे निधीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पुढाकार घेत मृतांच्या नातेवाईकांना या योजनेची माहिती समजावून देत त्यांना अर्ज भरण्यास मदत करत आहेत. हे अर्ज ऑनलाईन देखील भरता येणार आहेत असे यादव यांनी सांगितले.

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यासाठी नागरिकांनी अर्ज करावा असे यादव यांनी म्हटले आहे.
निधी मिळण्यासाठी या गोष्टी आवश्यक…

अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत., मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची २ प्रत., जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र., अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक., अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत., मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र., आरटी-पीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज (पीडीएफ/जेपीजी)(मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसताना).

…येथे संपर्क साधा
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी शिवसाई नागरी पंतसंस्था कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिर जवळ. किंवा 919881245572 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button