breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुनसान ठिकाणी ती मित्रासोबत गप्पांमध्ये रंगली होती, पण तिच्यावर झाला…

अमरावती |

गावालगतच्या एमआयडीसी परिसरातील निर्जन स्थळी मित्र-मैत्रिणीच्या गप्पा रंगत होत्या. यावेळी मित्रासोबत एकांतात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना दत्तापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी मार्डी परिसरातून एकाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्याचे नाव आरतेश भोसले असे आहे. पुढील तपास केला जात आहे. तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या संपर्कातील मुलाशी मैत्री झाली. या संबंधातून ते दोघे शहराच्या पश्चिमेस तिवरा मार्गावरील एमआयडीसीच्या मागे एका शेतात जाऊन बसले. एकटे बसून गप्पा मारत असतानाच त्या ठिकाणी अचानक एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आला. त्याने बेधडक तिच्या मित्राला मारणे सुरू केले. त्याच्या खिशातील मोबाइल फोन हिसकावून त्याला घटनास्थळावरून पळवून लावले. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे घाबरून तोही दूरवर जाऊन लपून बसला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्या मित्राचा हिसकावलेला मोबाइल फोन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या भयंकर घटनेनंतर ते दोघेही आपापल्या घराकडे परतले. भीतीपोटी दोघांनीही कुणालाच ही बाब सांगितली नाही. दरम्यान बलात्कार करणाऱ्या त्या भामट्याने तिच्या मित्राच्या मोबाइलवरून तिच्याशी पुन्हा संपर्क केला आणि शरीरसुखाची मागणी करून भेटायला बोलावू लागला. यातून मार्ग काढण्यासाठी तिने त्या व्यक्तीला सोमवारी पुलगाव येथे बोलावले. तेथे त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला मात्र, तो तेथूनही निसटला. अखेर दत्तापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन अज्ञात आरोपीवर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा (पोक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका चौधरी यांनी तपास सुरू केला असून मार्डी परिसरात तो नराधम आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button