breaking-newsक्रिडा

कॉन्टिफ चषक फुटबॉल स्पर्धा : भारताचा बलाढ्य अर्जेंटिनावर 2-1 ने विजय

व्हॅलेन्सिया (स्पेन): सहा वेळा विश्वविजेता राहिलेल्या अर्जेंटिना संघाला भारतीय संघाने स्पेनमध्ये सुरू असलेल्या कॉन्टिफ चषक 20 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात 2-1 ने पराभूत करताना खळबळजनक निकालाची नोंद केली. भारताच्या अनिकेत जाधव या खेळाडूला 50व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाल्याने बाहेर जावे लागल्यानंतर केवळ दहा खेळाडू मैदानात असूनही भारताने हा विजय खेचून आणला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील स्पर्धेत भारतीय संघाला याचा निश्‍चितच फायदा होईल.

फ्लॉइड पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला याआधी म्युरसिया (2-0) आणि मॉरिटॅनिया (3-0) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता, तर त्यांनी व्हेनेझुएलाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. मात्र, सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी सहा वेळा 20 वर्षांखालील विश्‍वचषक उंचावणाऱ्या अर्जेंटिनाला नमवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्‍का दिला.

भारतीय संघ या सामन्यात पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेताना दिसला. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दीपक तनगीरने गोल करत भारताचे खाते उघडले. तर सामन्याच्या उत्तरार्धात 68व्या मिनिटाला अन्वर अलीने भारतीय संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाचा संघ दबावाखाली खेळताना दिसला. त्यानंतर 72 व्या मिनिटाला अर्जेंटिनाने आपला सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला.

पहिल्या चार मिनिटांमध्येच गोल नोंदवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. संपूर्ण सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगला खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. ज्यामुळे अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर दडपण वाढत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर झालेला दिसून आला. परिणामी सामन्यात त्यांना केवळ एकच गोल नोंदवता आला.

भारताचा गोलरक्षक प्रभाकरन गिलने 56व्या आणि 61व्या मिनिटाला दाखवलेल्या चपळाईमुळे अर्जेंटिना संघाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली नाही. अर्जेंटिना संघाने केलेले अनेक प्रयत्न त्याने परतवून लावले. पाच मिनिटांच्या जादा वेळेमध्ये अर्जेंटिना संघाने सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मारलेल्या फटक्‍यावर चेंडू गोलपोस्टवर आदळून बाहेर गेला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळामुळेच भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.
कर्णधार अरमित सिंग कियाम याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला चकित करणाऱ्या या भा

रतीय संघात गोलरक्षक प्रभाकरन गिलसह, आशिष राय, जितेंद्र सिंग, अन्वर अली, साहिल पन्वर, बोरिस सिंग तांगजाम, सुरेश सिंग वांगजाम, दीपक तनगीर, निथोनांबा मिथाई व अनिकेत जाधव या खेळाडूंचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button