breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

स्मार्टफोनचा ४०-८० नियम तुम्हाला माहितय का? या नियमात कधीच खराब होणार नाही फोन बॅटरी!

Smartphone Charging 40 80 Rule | आजच्या काळात सर्वच लोकांचं बहुतांश काम हे फोनवर अवलंबून असतात. ते सर्वच जण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोनवरच असतात. पण फोन वापरताना सर्वात महत्वाची असते ती फोनची बॅटरी. पण ही बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी योग्यपद्धतीने बॅटरी वापणं देखील गरजेचं आहे. ज्यामुळे तिचं आयुष्य जास्त काळ टिकतं.

फोनची बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी आम्ही काही टिप्स फॉलो करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला “४०-८० चार्जिंग नियम” पाळायला हवं. या नियमानुसार, तुमचा फोन ४०% पेक्षा कमी चार्ज ठेवू नये आणि ८०% पेक्षा जास्त चार्ज करू नये.

हेही वाचा     –    ‘भाजपात आजपर्यंत कधीच फूट पडली नाही कारण..’; देवेंद्र फडणवीसांचा सूचक विधान 

एवढेच नव्हे तर लिथियम-आयन बॅटरी आजकाल बहुतेक फोनमध्ये वापरल्या जातात, त्या ठराविक संख्येच्या ‘डिस्चार्ज-चार्ज सायकल्स’साठी चार्ज केल्या जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमचा फोन ०% ते १००% चार्ज करता, तेव्हा डिस्चार्ज-चार्ज सायकल पूर्ण करतो.

तुम्ही तुमच्या फोनच्या बॅटरीवर जितकी जास्त डिस्चार्ज-चार्ज सायकल करतो तितक्या लवकर ती खराब होते. म्हणून, ४०-८० चार्जिंग नियमाचे पालन करून, तुम्ही तुमच्या फोनच्या बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button