breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शासनाने निर्देशांनुसार दुसऱ्या मात्रेच्या लाभार्थ्यांचे ४० टक्के लसीकरण

विरार |

शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ज्यांची लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण होऊन दुसऱ्या मात्रेची वेळ आली आहे त्यांचेच सध्या लसीकरण केले जात आहे. शहरातील दुसऱ्या मात्रेच्या लाभार्थ्यांनुसार पालिकेने पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ४० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. महानगरपालिकेने २१ आरोग्य केंद्रांवर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण सुरू केले आहे. त्यानुसार मागील चार दिवसांत २१ मे रोजी ७.८१ टक्के, २२ मे रोजी १४.५ टक्के, २३ मे रोजी ४०.१ टक्के तर २४ मे रोजी ३१.१ टक्के लसीकरण झाले आहे.

एकूण लसीकरण एक लाख १५ हजार ५०२ झाले असून त्यातील दुसरी मात्रा दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३३ हजार ८२ आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार  आरोग्यसेवक ८६०९, पहिल्या फळीतील ३९०८, सहव्याधी आणि वयोगट ४५ ते ते ५९ मधील ५५५० तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक १४५०१ लाभार्थ्यांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. सध्या पालिकेकडे लशींचा पुरवठा मर्यादित आहे. यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने २१ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.

वाचा- शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती जपून ठेवण्याची सूचना- कृषी खाते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button