breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढीला आज ब्रेक, पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे!

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून इंधर दरात चोरपावलांनी वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज एक दिवसाचा दिलासा मिळाला असून आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती कपातही झाली नसून वाढही झाली नाही. मंगळवारी पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेल ४४ पैश्यांनी महागले होते.

दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर 93.44 आणि डिझेल 84.32 रुपये इतके आहेत. तर, मुंबईत हे दर 99.71 रुपये पेट्रोल आणि 91.57 रुपये डिझेल इतक्यावर स्थिर आहेत. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी 93.49 आणि डिझेलसाठी प्रती लीटरमागे 87.19 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 95.06 रुपये आणि डिझेल 89.11 रुपयांना विकलं जात आहे.

मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. तर, सोमवारी या किंमती स्थिर होत्या. रविवारी मात्र हे दर वाढले होते. त्यामुळं मागील तीन दिवसांत दोनदा इंधनाची दरवाढ झाली होती.

दर दिवशी सकाळच्या सुमारास निर्धारित होतात इंधनाचे दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीदिनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे निर्धारित होतात. दर निर्धारित करण्यापूर्वी तेल उत्पादन आणि वितरक कंपन्या महत्त्वाच्या गोष्टीं अंदाजात घेत दर निश्चित करतात. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दर दिवशी देशातील सर्व शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची निश्चिती करतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button