इलियाना आणि विद्या पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र झळकणार
इलियाना आणि विद्या पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र झळकणार
मुंबई:प्रतिनिधि
अभिनेत्री इलियाना डिक्रूज विद्या बालन, प्रतीक गांधी आणि सेंधील राममूर्ती नव्या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी आणि सेंधील राममूर्ती यांच्यासोबत दिसून येणार आहे. इलियाना आणि विद्या पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन शीर्षा गुहा ठाकुरता हे करत आहेत.
इलियानाने या चित्रपटाची माहिती ,वर शेअर केली आहे. विद्या बालन, प्रतीक गांधी आणि सेंधील राममूर्ती यासारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. शीर्षा यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत असल्याने अत्यंत आनंद होतोय. हा एक वास्तवावर आधारित चित्रपट असल्याचे इलियानाने म्हटले आहे.
विद्या बालन या चित्रपटात काव्या नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात नात्यांमधील आधुनिकतेचा पैलू दिसून येईल. याची कथा सर्वसामान्यांशी जवळीक साधणारी असल्याचे विद्याकडून म्हटले गेले. चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई आणि ऊटीमध्ये सुरू आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.