breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीला कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल
कोलकत्ता | टीम ऑनलाइन
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गांगुली एक वर्षभरात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल होत आहेत. याआधी जानेवारीमध्ये हार्ट अटॅकमुळे गांगुलीला रुग्णालयात जावं लागलं होतं. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेल्यानंतरही गांगुलीला कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या गांगुलीला कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संकटात आता गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी ही त्याच्या चाहत्यांसाठी चिंतेची आहे. याआधी रुग्णालयात असताना त्याच्यावर एकाच महिन्यात दोन वेळा Angioplasty करावी लागली होती. यातून बरं झाल्यानंतर गांगुली पुन्हा कामात व्यस्त झाला होता.