breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी कचरा डेपोवरील बायोमायनिंग प्रकल्प पिंपरी-चिंचवडसाठी ‘आरोग्यदायी’

  • अन्य प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी खर्चात प्रकल्प
  • महापालिका प्रशासनाचे कोट्यवधी रुपये वाचणार

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

शहरातील निर्माण होणारा दैनंदिन सुमारे एक ते दीड मेट्रीक टन कचरा मोशी डेपो येथे येत आहे. कचरा डेपोची सुमारे ८१ एकर जागा मागील २५ ते ३० वर्षापासून कचरा डेपोसाठी वापरत आहे. संबंधित कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी आता महापालिका पर्यावरण विभागाच्या पुढाकाराने बायोमायनिंग प्रकल्प उभारला जात आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार शास्त्रोक्त पध्दतीने दैनंदिन  कच-यावर  प्रक्रिया  करणेत येत आहे. गेल्या २० ते २५ वर्षामधील साठवलेल्या कच-यावर यापुर्वीच शास्त्रोक्त पध्दतीने कॅपिंग सन २०१२-२०१४ च्या दरम्यान करणेत आले आहे.तसेच यापुर्वीच्या वापरातील SLF-1 ची क्षमता ही संपलेली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत कचरा प्रश्न निकालात काढण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प राबवण्याची भूमिका घेतली.

मात्र, महापालिका स्थायी समिती सभेपुढे हा प्रस्ताव ऐनवेळी आला म्हणून त्याबाबत संशयाने पाहिले जात आहे. परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. विद्यमान स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आणखी एक- दोन सभाच त्यांच्या अध्यक्षतेखाली होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कार्यकाळात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली, अशी अपेक्षा विद्यमान स्थायी समिती सभापतींना असने गैर नाही. त्यामुळेच हा प्रस्ताव ऐनवेळी घेवून तात्काळ मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे सादरीकरण स्थायी समितीच्या सदस्यांसमोर करण्यात आले.

अन्य शहरांच्या तुलनेत कमी खर्चात प्रकल्प…

वास्तविक, राज्यातील प्रमुख शहरे उदाहणार्थ कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि वसई-विरार याठिकाणी असा प्रकल्प रबवण्यात आला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात होणारा प्रकल्प वरिल सर्व शहरांच्या तुलनेत कमी खर्चात होत आहे. परिणमी, महापालिका प्रशासनाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत, ही बाब दुर्लक्षीत करुन चालणार नाही.

Biomining-pcmc-1
Biomining-pcmc-1

प्रकल्पाची आवश्यकता काय?

कचरा डेपोमधील जागेत गांडुळखत प्रकल्प,प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे.तसेच बायोमेडीकल वेस्ट प्रकल्पाचे काम चालू करणेत येत आहे. त्याचप्रमाणे वेस्ट टु एनर्जी प्रकल्पाचे काम चालू करणेत आले आहे.त्याअंतर्गत COD -1 नुसार १००० मे. टन प्रतिदिन क्षमतेचा मटेरिअर  रिकव्हरी फॅसिलिटी ( MRF) चा वापर सप्टेंबर २०१९ पासून चालू करणेत आला आहे.मोशी कचरा डेपो येथील बहुतांश उपलब्ध जागेचा वापर करणेत आला आहे. सद्यस्थितीत प्रक्रिया केलेनंतरचे  Inert टाकणेसाठी SLF टप्पा – २ चा वापर चालू करणेत आला आहे. SLF- २ ची उपलब्ध जागाही नजीकच्या काळात संपत असल्याने व या व्यतिरिक्त कचरा डेपोसाठी जागा शिल्लक नसल्याने  यापुर्वीच्या कॅपिंग I व II तसेच SLF-1 चे  बायोमायनिंग पध्दतीने प्रक्रिया करुन जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

Biomining-pcmc-2
Biomining-pcmc-2

निविदा प्रकियेतील सुस्पष्टता…

बायोमायनिंग प्रकल्पासाठी हिंद एग्रो एन्ड केमिकल- साई गणेश एंटरप्राईझेस, खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., एन्टोनी लारा एन्व्हायरो सोल्युशन प्रा. लि. आणि झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्युशन प्रा. लि. या कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी एल-१ दराची निविदा भरणाऱ्या हिंद एग्रो कंपनीला काम देण्यात आले आहे.

Biomining-pcmc-3
Biomining-pcmc-3
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button