पिंपरी / चिंचवडपुणे

पक्षाचे चिन्ह असते तर राहुल कलाटे 100 टक्के आमदार असते – संजय राऊत

पिंपरी चिंचवड | विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून राहुल कलाटे अपक्ष लढले. त्यांना सव्वा लाख मते पडली. युती असल्याने त्यांना शिवसेनेचे चिन्ह देता आले नाही. चिन्ह न घेता कलाटे यांनी सव्वा लाख मते घेतली. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असते. तर, कलाटे 100 टक्के आमदार असते, असे भाष्य शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. युतीमुळे कलाटे यांना चिन्ह देता आले नसल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखविले.

चिंचवड मतदारसंघातून राहुल कलाटे अपक्ष लढले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिला होता. परंतु, या दोनही पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी कलाटे यांना मनापासून साथ दिली नसल्याचे मतदानातून दिसून आले. शिवसेनेच्या नेत्यांनीही युतीचे कारण देत भाजपचे लक्ष्मण जगताप यांचा प्रचार केला. असे असताना कलाटे यांनी कडवी झुंज देत सव्वा लाख मते घेतली. लक्ष्मण जगताप यांचा अवघ्या 40 हजार मतांनी विजय झाला. कलाटे यांचा थोड्या मताने पराभव झाल्याने आणि त्यांना शिवसेनेचे चिन्ह देता न आल्याचे शल्य खासदार राऊत यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात बोलून दाखविले.

खासदार राऊत म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे उभे राहिले. त्यांना सव्वा लाख मते पडली. चिन्ह न घेता कलाटे यांनी एवढी मते घेतली. चिन्ह न घेता ते लढले. चिन्ह जर घेतले असते. तर, 100 टक्के कलाटे आमदार झाले असते. आपण त्यांना जर आपण चिन्ह देऊ शकलो असतो. तर, 100 टक्के आपला हा माणूस आमदार झाला असता. पण, आपण फार युती धर्म पाळणारे लोक असतो. त्यांनी (भाजपने) आपल्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालतो. पण, आपण नको युती आहे, युती धर्म पाळला पाहिजे असे म्हणतो. पण, जेव्हा महापालिका, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतात. तेव्हा आपल्याला त्यांनी (भाजपने) किती युती धर्म पाळला हे कळते. आता धर्म युद्धाचा विचार सोडून आपण खऱ्या युद्धाकडे वळले पाहिजे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button