TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

‘पेशंट कसा असावा याचे आयडियल उदाहरण’; प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील फोटो समोर

पुणेः ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे  यांना कर्करोगाचे निदान झालं आहे. ७४ वर्षीय प्रकाश आमटेंवर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अनिकेत आमटे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

प्रकाश आमटे यांना दुर्घर हेलरी सेल ल्युकेमिया- ब्लड कॅन्सरचे निदान झालं आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकाश आमटे यांचा पुत्र अनिकेत आमटे यांनी फेसबुकवर शुक्रवारी एक पोस्ट करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसंच, त्यांची प्रकृतीही ठिक असल्याचं म्हटलं आहे.

बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. २-३ दिवसांनी पुन्हा चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यू ठीक असल्यास लवकरच (८-१० दिवसात) किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे. रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि दवाखान्यातील अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा, मावश्या सर्वांचे आभार. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, असं अनिकेत आमटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकाश आमटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आमटे कुटुंबियांनी त्यांना फोन व मेसेज करु नये. भेटायला येऊ नये. लवकरच ते ठणठणीत बरे होतील यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया. बरे झाल्या नंतर हेमलकसाला भेटायला यावे, अशी विनंती केली होती. आमटे कुटुंबिय वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट देत असतात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button