breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘वेळ आल्यावर तुम्हालाही चुना लावेन’, गुलाबराव पाटलांचा खासदार संजय राऊतांना इशारा

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडाळी केली. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. आमदारांनी बंड पुकारल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात ताशेरे ओढले. कधी त्यांचे १०० बाप असं म्हटलं, तर कधी त्यांची प्रेतं मुंबईत येतील अशी जिव्हारी लागणारी टीका केली. त्याला आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव यांनी तशाच शब्दात उत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरीवर बसवू, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर, “आम्ही आयत्या बिळावर नागोबा नाही, आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना (संजय राऊत) माहित नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना चुना लावेल”, असं म्हणत गुलाबरावांनी राऊतांवर टीका केली.

आज हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीतून गोव्यात जाणार आहेत. दुपारी ३ वाजता ते गुवाहाटीतून निघतील. त्यापूर्वी बंडखोरांनी हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गुलाबराव पाटील बोलत होते. “आमची परिस्थिती नसतानाही आम्ही त्यांच्यासाठी (उद्धव ठाकरे) भरपूर केलं. हे जे मिळालं आहे निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने मिळालंय. पण आमचाही त्यात त्याग आहे. आम्ही आमच्या घरी तुळशी पत्र ठेवून काम केलेलं आहे. आम्ही आयत्या बिळावर नागोबावाले नाही. संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू. चुना कसा लावतात हे त्यांना माहित नाही अजून, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना चुना लावेल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी एक शायरीही ऐकवली – “आदमी तूट जाता हैं घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढाने में, उम्र बीत जाती हैं दोस्ती निभाने में…”

  • हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झाले – गुलाबराव पाटील

आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो. त्यामुळे आपण परिस्थिती सांभाळून घेऊ. आपण एवढेच जण त्यांना सभागृहात पुरेसे आहोत”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

  • ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करावं, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. तेव्हाच राज्यपाल मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. तिकडे, गुवाहाटीत असलेले शिंदे गटातील बंडखोर आमदारांनीही मुंबईत परतण्याची तयारी केली आहे. उद्या सर्व आमदार मुंबईत बहुमत चाचणीसाठी येतील, असं बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हे सर्व बंडखोर नेते आज गोव्यात जाणार आहे. त्यांच्यासाठी गोव्यातील हॉटेलमध्ये ७१ खोल्याही बुक करण्यात आल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button