breaking-newsराष्ट्रिय

वनीकरणावर उपग्रहाद्वारे लक्ष- प्रकाश जावडेकर

देशातील जमिनीवरच्या वनराईचे हिरवे आच्छादन व रोपण केलेल्या झाडांची वाढ याचे अचूक निरीक्षण करून माहिती देणारी उपग्रहावर आधारित यंत्रणा विकसित करण्यात येत असल्याची माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. काही राज्यांनी वृक्षलागवड मोहिमेतील झाडांची वाढ करण्यात मोठी कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, वनीकरणाचा बारीकसारीक व अचूक तपशील मिळवण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. पाच वर्षांत एकूण १२ कोटी झाडांची लागवड करण्यात आली असून त्यांच्या वाढीची माहिती सार्वजनिक पातळीवर उपलब्ध करण्यात आली आहे. भारतातील हरित आच्छादन वाढवण्यासाठी वनीकरण व्यवस्थापन व नियोजन निधी ४७ हजार कोटी रुपयांचा आहे, त्याचा वापर योग्य प्रकारे केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button