breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मी माझ्या वैयक्तिक कारणांसाठी पक्ष सोडत आहे: रुपाली ठोंबरे-पाटील

पुणे l  प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुका अथवा अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी इतर पक्षात जाण्याच्या हेतून मनसे पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. मी माझ्या वैयक्तिक कारणांसाठी पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे-पाटील यांनी दिली.

मनसे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, “राजीनाम्यानंतर माझी कुणाशीही चर्चा झालेली नाही. राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा होता. त्या पार्श्वभूमीर मी राजीनामा दिलेला नाही. मला कुठल्यातरी पक्षात जायचं म्हणून मी राजीनामा दिलेला नाही. मी ज्या पद्धतीने काम करते, त्या पद्धतीने त्या पद्धतीने काम करू दिलं तर राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षात जाईन. अथवा जो पक्ष मला माझ्या कार्यशैलीप्रमाणे काम करू देईल त्यात जाणार असल्याचे रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या.

दरम्यान मी माझ्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहे, ते करत राहणार असल्याचे रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितले. इतर पक्षांच्या ऑफर बाबत बोलताना त्या म्हणाल्या, “मला जर पक्ष सोडायचा असता तर सन 2019 मध्ये माझी ऐन वेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्याच वेळी मी पक्ष सोडला असता. त्यामुळे माझी पक्षावर नाराजी नाही. सन 2017 च्या निवडणुकीत मला भाजपने ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली होती. पक्षावरील आणि राज ठाकरे यांच्यावरील प्रेम यामुळे मी पक्ष सोडला नसल्याचे ठोंबरे-पाटील म्हणाल्या.

नुकतीच रुपाली ठोंबरे-पाटील यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे ही तिन्ही नेते महाराष्ट्राचे हिरे आहेत. त्यामुळे मी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची मागील काही दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यामागे राजकीय हेतू काहीही नव्हता. सुरुवातीपासून मी राज ठाकरे यांना भेटत आहे. यापुढे देखील भेटत राहील. मी आदरपूर्वक मनसे पक्ष सोडत आहे असे सांगत येणा-या काळात पुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांना उत्तर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button