breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीत 7 हजार विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर गीतांचे गायन

  • चक्कर आल्याने अनेक विद्यार्थी झाले अस्वस्थ
  • रुग्णवाहिका असुनही औषधांचा होता तुटवडा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील सुमारे साद हजार विद्यार्थानी एकत्र येऊन देशभक्तीपर सामुहिक गीत गायन केले. पिंपरी-चिंचवड शहरातील मदनलाल धिंग्रा मैदानावर आज या सादरीकरणाचे आयोजन केले होते. मात्र, यावेळी १४ ते १५ विद्यार्थांना चक्कर आल्याची घटना घडली.

वैद्यकीय उपचार वेळेत मिळावेत यासाठी मैदानावर रुग्णवाहिका देखील होती. परंतु, त्यात औषध नसल्याचे तेथील महिला डॉक्टरने सांगितल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. चक्कर आलेल्या विद्यार्थाना राजगीऱ्याचा लाडू खाण्यास दिले होते. दुधाच्या बाटल्या उपलब्ध होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ नेते एकनाथ पवार यांची भाषणे झाली.

पिंपरी-चिंचवड महापालिका, क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माध्यमिक आणि मनपाच्या प्राथमिक अश्या एकूण १०५ शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळेतील 7 हजार पेक्षा जास्त विद्याथर्यांनी एकत्र येऊन देशभक्तीपर गीत सादर केले.

‘आता उठवू सारे रान…’, ‘जहाँ डाल डाल पर…’, ‘उठा राष्ट्रविर हो सज्ज व्हा…’, असे एकूण तीन देशभक्तीपर गीतांचे सामुदायीक गायन केले. दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षक हे सकाळी साडेसहा वाजल्यापासून मैदानावर उपस्थित होते. देशभक्तीपर गीत गायन झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना चक्कर आली होती. संबंधित १४ ते १५ विद्यार्थाना स्टेजच्या बाजूला बसवण्यात आले होते. त्यांना राजगिऱ्याचा लाडू खाण्यासाठी देण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका असताना देखील त्यात औषध नसल्यामुळे उपचार होऊ शकले नाहीत. विद्यार्थ्यांना तसेच बसवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button