breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

HSC Result 2019 : पिंपरी-चिंचवडच्या मुली अग्रस्थानी, शहराचा निकाल 89.9 टक्के

पिंपरी, (महाईन्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 89.09 टक्के लागला. राज्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही मुलींनीच बाजी मारली आहे.

  • एचएससी बोर्डाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेतली. परीक्षेसाठी एकूण 17 हजार 491 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यामध्ये 9 हजार 560 मुलांची तर 7 हजार 931 मुलींची संख्या होती. एकूण 17 हजार 491 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील 15 हजार 568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 8 हजार 194 मुले आहेत. तर, 7 हजार 375 मुलींची संख्या आहेत. निकाची एकूण टक्केवारी लक्षात घेतली तर पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 89.09 टक्के लागला आहे. त्यामध्ये मुलींचा निकाल ९३.०१ टक्के तर मुलांचा निकाल ८५.८४ टक्के लागला.

या महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के 
जयहिंद हायस्कूल पिंपरी, पोदार इंटरनॅसनल स्कूल, द न्यू मिलेनियम स्कूल सांगवी, एस.एफ. जैन विद्यालय ज्यु. कॉ.चिंचवड, श्री स्वामी समर्थ ज्यु. कॉलेज भोसरी, के.जे. गुप्ता ज्यु. कॉलेज चिंचवड, मॉडर्न हायस्कूल ज्यु. कॉलेज निगडी, रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी, डॉ. डी. वाय, पाटील एज्युकेशन कॉलेज चिंचवड, निर्मल बेंथनी हायस्कूल काळेवाडी, शिवभूमी विद्यालय यमुनानगर निगडी, अमृता ज्यु.कॉलेज निगडी, एस.एन. बी. पी. ज्यु. कॉलेज मोरवाडी, सेंट उर्सुला स्कूल आकुर्डी, संचेती ज्यु.कॉलेज चिंचवड,, होरायझन इंग्लिश मिडियम स्कूल दिघी, सरस्वती विश्व विद्यालय, पी. बी. जोग विद्य़ालय चिंचवड, अभिषेक आर्टस, कॉमर्स ज्यु. कॉलेज चिंचवड, सिटी प्राईड ज्यु. कॉलेज प्राधिकरण निगडी, लिटिल फ्लॉवर्स ज्यु. कॉलेज जुनी सांगवी, क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल ज्यु. कॉलेज आकुर्डी, एस.एन.बी. पी. कॉलेज रहाटणी, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय,एस.एन. बी. पी.ज्यु. कॉलेज चिखली.

  • अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही
  • पिंपरी-चिंचवड शहरात बारावीच्या परीक्षेत १ हजार ९०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण मंडळाकडून यावर्षी दोन ते तीन महिन्यांत परीक्षा घेण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या परीक्षेत पास होता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याची खबरदारी शासनाकडून घेण्यात आली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button