breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील कचरा संकलन 1 जूलैपासून प्रत्यक्षात कामास सुरुवात

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने  शहरात कचरा संकलनासाठी राबविलेली निविदाप्रक्रिया पहिल्या दिवसापासून वादग्रस्त आहे. कामाचे आदेश दिल्यानंतर येत्या 1 जुनला देखील या दोन्ही ठेकेदारांकडून पुर्ण क्षमतेने काम सुरू करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे कचरा संकलनासाठी शंभर टक्के नवीन वाहनेंसह पुर्ण श्रमतेने काम सुरू करण्यासाठी आणखी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. आता 1 जुलै 2019 रोजी हे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम ए.जी. इनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन संस्थांना देण्यात आले आहे. हे दोन्ही ठेकेदार १ एप्रिलपासून काम सुरू करणार होते. मात्र, त्यांना नवीन वाहने घेण्यासाठी आणि पुर्ण क्षमतेने काम सुरू करण्यासाठी 1 जूनपर्यंतची मुदत दिली होती. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी महापालिका अधिकारी, ठेकेदार यांची बैठक घेतली. त्यात आढावा घेऊन ठेकेदारांच्या तयारीची माहिती घेण्यात आली.

त्यामध्ये या ठेकेदारांकडून पुन्हा 1 जुन रोजी पुर्ण क्षमतेने काम सुरू करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. 1 जून रोजी 50 टक्केच वाहने तयार असून तोपर्यंत पालिकेच्या जुनी वाहने वापरण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यावर स्थायी अध्यक्ष मडिगेरी आणि अधिका-यांकडून त्यांना आणखी महिनाभराची मुदत देण्यात आली. अर्धवट काम सुरू केल्यास पालिकेला आणखी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या 1 जुलै रोजी पुर्ण क्षमतेने दोन्ही ठेकेदारांनी काम सुरू करावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. मात्र, ठेकेदारांकडून वारंवार विलंब करून तीन महिने काम सुरू करण्य़ास वाया घालविले आहेत. ठेकेदार नियुक्त करूनही मुदतवाढ देण्याची वेळ पालिकेवर आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button