breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात आजही होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: तब्बल 4 दिवस मुंबईसह अनेक उपनगरांना झोडपून काढणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून मात्र दडी मारलेली आहे. शुक्रवार सकाळपासून राज्यात पावसाचा जोर ओसरलेला आहे. मुंबईतल्या अनेक उपनगरांत हलक्या सरी वगळता पाऊस थांबलेला होता. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात आजही अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे.

8 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज राज्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा देखिल राहिल. त्यामुळे समुद्रकिनारी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 9 ऑगस्टला वातावरण ढगाळ राहिल. तर राज्यभर हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button