breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

Pune : घरांच्या किंमतीत वर्षभरात सरासरी ८ टक्के वाढ

पुणे : देशात घरांच्या किंमतीत यंदा वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात घरांच्या किंमतीत सरासरी ८ टक्के वाढ झाली आहे. पुण्यात ५८००-६००० रुपये चौरस फूट असे फ्लॅटचे सरासरी दर आहेत.

जानेवारी ते मार्च या कालावधीत प्रमुख आठ महानगरांमध्ये घरांच्या किमतीत सरासरी ७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक १० टक्के वाढ बंगळुरू शहरात झाली असून, त्याखालोखाल पुण्यात ८ टक्के वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख महानगरांमधील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल ‘प्रॉपटायगरडॉटकॉम’ने जाहीर केला आहे. यानुसार, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत नवीन घरांच्या सरासरी किमतीत वाढ झाली आहे. मागील वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत बंगळुरूमध्ये ही वाढ १० टक्के आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये बंगळुरूत घरांच्या किमती सर्वांत जास्त वाढल्या आहेत. त्याखालोखाल पुण्यात ही वाढ ८ टक्के आणि अहमदाबादमध्ये ७ टक्के आहे.

शहर घरांचा प्रतिचौरस फूट दर किमतीत वाढ (टक्क्यांमध्ये)

  • मुंबई : १०२००-१०४०० (५ टक्के)
  • पुणे : ५८००-६००० (८ टक्के)
  • बंगळुरू : ६२००-६४०० (१० टक्के)
  • अहमदाबाद : ३७००-३९०० (७ टक्के)
  • दिल्ली : ४७००-४९०० (६ टक्के)
  • हैदराबाद : ६२००-६४०० (४ टक्के)
  • कोलकाता : ४६००-४८०० (६ टक्के)
  • चेन्नई : ५७००-५९०० (१ टक्के)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button