breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थळी बारणे यांची भेट

पनवेल, 19 एप्रिल – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांपैकी अग्रस्थानी राहिलेले आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी जाऊन शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी अभिवादन केले. रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावात आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके स्मृती मंदिरास बारणे यांनी भेट दिली.
यावेळी आमदार मनोहर भोईर, अरुण भगत, भाजप सरचिटणीस पनवेल महेश बालदी, सरपंच साधना कातकरी, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, भाजपचे तालुका संघटक दशरथ म्हात्रे, माजी उपसरपंच प्रमोद करमळकर विजय भोपी, भाऊ वाझेकर, विशाल वाझेकर, हरिश्चंद्र वाझेकर, संतोष वाझेकर, पराग वाझेकर, अनिल वाझेकर, अविनाश वाकडेकर, जयेश वाझेकर, अनिकेत वाझेकर, संतोष ठाकूर, अवचित राऊत आदी उपस्थित होते.
आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके यांचे रायगड जिल्ह्यातील  शिरढोण हे जन्मगाव आहे. महादेव गोविंद रानडे क्रांतिवीर आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा वासुदेव बळवंत फडके त्यांच्यावर प्रभाव पडला होता. विविध जाती धर्मातील तरुणांना एकत्र करून त्यांनी सशस्त्र क्रांती केली. सशस्त्र क्रांतीचा मोठा इतिहास भारताला आहे. त्यात वासुदेव बळवंत फडके यांचा अग्रस्थानी आहे. शिरढोण येथे असलेल्या आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती मंदिर जाऊन खासदार बारणे यांनी अभिवादन केले. वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव मावळ लोकसभा मतदारसंघात येते. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करायला हवा, अशा भावना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button