breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भा.ज.पा.महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांचेकडून “स्त्री सुरक्षिततेच्या मोहीमेस” सुरूवात

स्त्री सन्मान व सुरक्षिततेचे संस्कार शिवबावर ज्या पुण्यभूमीत जिजाऊंनी रूजविले,त्या शिवनेरीच्या पायथ्याशी जिजाऊंच्या पुतळ्यास नमन करून भा.ज.पा.महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांचेकडून “स्त्री सुरक्षिततेच्या मोहीमेस” सुरूवात!

पुणे| आंबेगांव तालुक्यातील मंचर परीसरातील सहा मुली व जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील चौदा मुली मागील एक-दीड महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे.सदरची माहिती समजताच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे ताबडतोब मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या.

मुली 18 वर्षांच्या असून कदाचित स्वखुशीने गेल्या असाव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.असे पोलीसांकडुन सांगण्यात आले.परंतू,समाजातील काही अपप्रव्रुत्तींकडून मुलींना फुस लावून त्यांना मानवी तस्करी,अवयव तस्करी,लव्ह जिहाद,देहविक्रय व्यवसाय अशा अनेक भयानक व बेकायदेशीर प्रकारात ओढले जात आहे. मुलींचे पालक हतबल आणि चिंताग्रस्त होत आहेत.पोलीसांनी प्रत्येक मिसींग तक्रारीकडे गांभीर्याने बघावे, असे उमाताई यांनी आवाहन केले.
कोरोनाचे काळात सरकार व पोलीस इतर कोणत्याच गुन्ह्याकडे,सामाजिक प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.अशीच परिस्थिती राहीली,तर समाजात अराजकता माजेल असेही त्यावेळी त्या म्हणाल्या.
पोलीसांनी लवकरात लवकर ह्या सर्व मिसींग तक्रारींचा योग्य तपास करून खरा प्रकार समोर आणावा, अन्यथा महिला मोर्चाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला
जुन्नर शहरातील भाजपा, संघपरिवार,हिंदुधर्मजागरण मंचाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून महिला सुरक्षिततेबद्दल जागृत राहण्याचे आवाहन खापरे यांनी केले.

सत्कार नको, गरजू विद्यार्थ्यांना मदत करा…
संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे, अश्या परिस्थितीमध्ये माझ्या नवीन नियुक्तीबद्दल माझा सत्कार न करता समाजातील आपल्या गरजु विद्यार्थी बांधवांसाठी वह्या द्या, असे आवाहन खापरे यांनी केले
“गुरूपौर्णिमेनिमित्त रा.स्व.संघाच्या उत्सवात जुन्नर य़ेथील प्राचीन विष्णुमंदीरामध्ये ध्वजाचे पुजन करण्यात आले.


यावेळी ज्योती जाधव, शैला मोळक, अँड.वर्षा डहाळे , अश्विनी ढमाले व जुन्नरचे भागकार्यवाह संदीप धानापुने, अजित डुंबरे, गोसावी, श्रोत्री,
अंबर परदेशी, गणेश बुट्टेपाटील, श्वेता गोसावी, सुनिल शहा, नंदुशेठ तांबोळी, भवाळकर, संतोष परदेशी तसेच मंचर येथे तालुकाध्यक्ष डाँ.कर्हाळे, श्री. एरंडे, विजय पवार, अँड.चेतन उदावंत हे सर्व प्रमुख पदाधिकारी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button